रविवार, १० मे, २०२०

यावे ज्ञानासाठी ,जावे सेवेसाठी

लोक सहभागामधून  बांधलेले  शाळा प्रवेशद्वार
                शाळेचे मोडकळीस आलेले जुने प्रवेशद्वार काढून नवीन प्रवेशद्वार बांधण्यात आले.त्यासाठी लोकसहभागामधून बळीराम जिजीबा गोरे यांनी लोखंडी प्रवेशद्वार(गेट) दिले .त्यावर लोखंडी कमान चंद्रकांत  कोंडजी गोरे यांनी दिली.ग्राम पंचायतने १४ व्या वित्त आयोगामधून शाळेचे संरक्षण भिंतिची उंची वाढवून त्यावर तार लावून दिली. त्यावरील बाहेर व आतमधून सुंदर रंगरंगोटी हि लोकवर्गणी मधून तसेच विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमात मिळालेल्या बक्षिसमधून करण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारावर असलेल्या "यावे  ज्ञानासाठी ,जावे  सेवेसाठी " या ब्रिदवाक्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या  सर्वांगिण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व गावकरी  प्रयत्नरत   आहेत. 

"यावे  ज्ञानासाठी ,जावे  सेवेसाठी " लोक सहभागामधून  बांधलेले  शाळा प्रवेशद्वार
तर्फे - चंद्रकांत  कोंडजी गोरे

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

माझी शाळा सोनखास

माझी शाळा सोनखास विषयी थोडेसे 

         जिल्हा परिषद वरिष्ठ  प्राथमिक शाळा सोनखास  ची स्थापना इ.स.१९५५ मधली आहे.शाळेच्या परिसरात पिंपळवृक्ष अतिशय देखनीय असून परिसर बोलका व वृक्षानी बहरलेला आहे. रमणीय परिसर  ,डिजिटल वर्ग खोल्या,ज्ञानरचनावाद व गुणवत्तापुुर्ण  शिक्षण, असून विविध उपक्रम शाळेत राबवले जातात. शाळेला गावकरयांचे संपुर्ण सहकार्य असून लोकसहभागातून शाळेचा विकास झालेला दिसून येतो.


लोकसहभागातून प्रवेशद्वार व कमान 


शाळेचा गणवेश 
 
शाळेचा गणवेश 


शनिवारचा योगाभ्यास 




My School Logo


जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सोनखास,पं.स.वाशिम. जि.प.वाशिम.

My School Logo