बदली
प्रक्रिया 2025 (बदली पोर्टल सुरू झाले आहे)
विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग २
अर्ज भरण्याअगोदर आधी खालील सूचना वाचून आपला अर्ज अचूक भरावा महत्त्वाचे
बदली पोर्टलवर सद्यस्थितीत संवर्ग एक साठी होकार /नकार व संवर्ग दोन साठी बदली कोण मागणार आहे याकरिता प्रत्यक्षात अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
CADRE 1(विशेष संवर्ग भाग-१)
• विशेष संवर्ग भाग-१: शिक्षकांनी जर विशेष संवर्ग
भाग-१ हा पर्याय निवडला, तर त्यांना विशेष संवर्ग भाग-१ हा अर्ज दिसेल.
• शिक्षक जर बदलीपात्र असेल आणि तो विशेष संवर्ग
भाग-१ मध्येही येत असेल आणि त्याला बदलितून सूट हवी असेल तर तो
'मला बदलितून सूट हवी आहे?' या प्रश्नाचे उत्तर 'Yes' निवडेल.
• त्याचे नाव बदलीपात्र शिक्षकांच्या यादीत आहे आणि
त्याला बदली विशेष संवर्ग भाग-१ मधून बदली हवी असेल
तर 'मला
बदलितून सूट हवी आहे?' या प्रश्नाचे उत्तर तो 'No' निवडेल.
• त्यानंतर विशेष संवर्ग भाग-१ चे प्रकार त्याला
ड्रॉपडाऊन मधून निवडायचा आहे.
• जर त्याने 'स्वतःचे' Self निवडले
तर त्याला खालील ड्रॉपडाऊन मधील चौदा पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे.
• जर त्याने 'जोडीदाराचे' Spouse निवडले तर त्याला
खालील ड्रॉपडाऊन मधील सहा पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे व अर्ज सबमिट करायचं
आहे.
• मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एखाद्या शिक्षकाचा
विशेष संवर्ग 1 अथवा 2 चा अर्ज रद्द केला असेल तर त्या शिक्षकाला पुनः अर्ज करता
येणार नाही व बदली प्रक्रियेतून त्याचा अर्ज बाद होईल.
• विशिष्ठ मुदतीमध्ये शिक्षकांना आपला अर्ज कितीही
वेळा मागे घेता येईल व पुनः भरता येईल.
CADRE 2(विशेष संवर्ग
भाग-२)
• विशेष संवर्ग भाग-२: शिक्षकांनी जर विशेष संवर्ग
भाग-२ हा पर्याय निवडला तर त्यांना विशेष संवर्ग भाग-२ चा अर्ज दिसेल.
• शिक्षकांनी ३० किमी चा चेक बॉक्स चेक केला की
त्यांना पुढील अर्ज दिसेल.
• आणि त्यांच्या व त्यांच्या जोडीदाराच्या शाळेमधले
अंतर त्यांना येथे नमूद करावे लागेल.
• जर शिक्षकांनी प्रथम प्रकार म्हणजे दोन्ही जोडीदार
जिल्हा परिषदेत कार्यरत आहे हा पर्याय निवडला तर शिक्षकाला त्याच्या जोडीदारचा
शालार्थ आयडी प्रविष्ट करायचा आहे.
• अर्ज भरताना शिक्षकांना त्यांच्या व त्यांच्या
जोडीदाराच्या मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
• जर शिक्षकांनी दुसरा ऑप्शन निवडले तर त्यांना
जोडीदारचा शालार्थ आयडी द्यायची आवश्यकता नाही. ते अर्ज सबमिट करू शकतात.
• मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एखाद्या शिक्षकाचा
विशेष संवर्ग 1 अथवा 2 चा अर्ज रद्द केला असेल तर त्या शिक्षकाला पुनः अर्ज करता
येणार नाही व बदली प्रक्रियेतून त्याचा अर्ज बाद होईल.
• विशिष्ठ मुदतीमध्ये शिक्षकांना आपला अर्ज कितीही
वेळा मागे घेता येईल व पुनः भरता येईल.
वरील सूचना वाचून आपला अर्ज अचूक भरावा.
पोर्टल लिंक
https://ott.mahardd.com/
आपलाच
जगन्नाथ आरू
https://jaganaru.blogspot.com
विशेष
संवर्ग भाग-1 साठी प्राधान्यक्रम
|
प्राधान्यक्रम
|
विशेष संवर्ग भाग-1 साठी प्राधान्यक्रम
|
|
|
1.
|
पक्षाघाताने आजारी शिक्षक
|
|
|
2.
|
दिव्यांग
शिक्षक, मानसिक विकलांग / दिव्यांग
मुलाचे
आई वडिल तसेच ज्या शिक्षकाचे जोडिदार मानसिक विकलांग / दिव्यांग आहेत असे शिक्षक
|
|
|
3.
|
हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक
|
|
|
4.
|
जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक
/ डायलीसीस सुरु असलेले शिक्षक
|
|
|
5.
|
यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक
|
|
|
6.
|
कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक
|
|
|
7.
|
मेंदूचा आजार झालेला शिक्षक
|
|
|
8.
|
थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे
उद्भवणारे आजार
|
|
|
9.
|
माजी सैनिक तसेच आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जवानाच्या पत्नी /विधवा
|
|
|
10.
|
विधवा शिक्षक
|
|
|
11.
|
कुमारिका शिक्षक
|
|
|
12.
|
परित्यक्ता / घटस्फोटित महिला शिक्षक
|
|
|
13.
|
वयाचे 53 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षक
|
|
|
14.
|
स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा/मुलगी/नातू/नात(स्वातःत्रय सैनिक हयात
असेपर्यंत )
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
खालील
आजाराने ग्रस्त शिक्षकांचे जोडीतून व्याधिग्रस्त शिक्षक
|
प्राधान्यक्रम
|
विशेष संवर्ग भाग-1 साठी प्राधान्यक्रम
|
|
|
15.
|
हृदय शस्त्रक्रिया झालेले
|
|
|
16.
17
|
जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले / डायलीसीस
सुरु असलेले
यकृत प्रत्यारोपण झालेले.
|
|
|
18.
|
कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले
|
|
|
19.
|
मेंदूचा आजार झालेले
|
|
|
20.
|
थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले
|
|
विशेष
संवर्ग भाग-2 साठी प्राधान्यक्रम
|
प्राधान्यक्रम
|
विशेष संवर्ग भाग-2
साठी प्राधान्यक्रम
|
|
1.
|
पती-पत्नी दोघेही जिल्हा
परिषद कर्मचारी असतील तर
|
|
2.
|
पती-पत्नी दोघांपैकी
एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर
|
|
3.
|
पती-पत्नी दोघांपैकी
एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर
|
|
4.
|
पती-पत्नी दोघांपैकी
एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल
तर महानगरपालिका /नगरपालिका
|
|
5.
|
पती-पत्नी दोघांपैकी
एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील
कर्मचारी असेल तर
|
|
6.
|
पती-पत्नी दोघांपैकी
एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक/कर्मचारी असेल तर
|
|
7.
|
पती-पत्नी दोघांपैकी
एक/दोघेही शिक्षण सेवक /तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर.
|
आपलाच
जगन्नाथ आरू
https://jaganaru.blogspot.com