लोक सहभागामधून बांधलेले शाळा प्रवेशद्वार
शाळेचे मोडकळीस आलेले जुने प्रवेशद्वार काढून नवीन प्रवेशद्वार बांधण्यात आले.त्यासाठी लोकसहभागामधून बळीराम जिजीबा गोरे यांनी लोखंडी प्रवेशद्वार(गेट) दिले .त्यावर लोखंडी कमान चंद्रकांत कोंडजी गोरे यांनी दिली.ग्राम पंचायतने १४ व्या वित्त आयोगामधून शाळेचे संरक्षण भिंतिची उंची वाढवून त्यावर तार लावून दिली. त्यावरील बाहेर व आतमधून सुंदर रंगरंगोटी हि लोकवर्गणी मधून तसेच विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमात मिळालेल्या बक्षिसमधून करण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारावर असलेल्या "यावे ज्ञानासाठी ,जावे सेवेसाठी " या ब्रिदवाक्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व गावकरी प्रयत्नरत आहेत.
"यावे ज्ञानासाठी ,जावे सेवेसाठी " लोक सहभागामधून बांधलेले शाळा प्रवेशद्वार तर्फे - चंद्रकांत कोंडजी गोरे |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा