रविवार, ८ जून, २०२५

बदली प्रक्रिया 2025 संवर्ग भाग १ व भाग २


बदली प्रक्रिया 2025 (बदली पोर्टल सुरू झाले आहे)

विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग २

अर्ज भरण्याअगोदर आधी  खालील सूचना वाचून आपला अर्ज अचूक भरावा महत्त्वाचे


बदली पोर्टलवर सद्यस्थितीत संवर्ग एक साठी होकार /नकार व संवर्ग दोन साठी बदली कोण मागणार आहे याकरिता प्रत्यक्षात अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.


CADRE 1(विशेष संवर्ग भाग-१)

 

• विशेष संवर्ग भाग-१: शिक्षकांनी जर विशेष संवर्ग भाग-१ हा पर्याय निवडला, तर त्यांना विशेष संवर्ग भाग-१ हा अर्ज दिसेल.


• शिक्षक जर बदलीपात्र असेल आणि तो विशेष संवर्ग भाग-१ मध्येही येत असेल आणि त्याला बदलितून सूट हवी असेल तर तो 'मला बदलितून सूट हवी आहे?' या प्रश्नाचे उत्तर 'Yes' निवडेल.


• त्याचे नाव बदलीपात्र शिक्षकांच्या यादीत आहे आणि त्याला बदली विशेष संवर्ग भाग-१ मधून बदली हवी असेल तर 'मला बदलितून सूट हवी आहे?' या प्रश्नाचे उत्तर तो 'No' निवडेल.


• त्यानंतर विशेष संवर्ग भाग-१ चे प्रकार त्याला ड्रॉपडाऊन मधून निवडायचा आहे.


• जर त्याने 'स्वतःचे' Self  निवडले तर त्याला खालील ड्रॉपडाऊन मधील चौदा पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे.


• जर त्याने 'जोडीदाराचे' Spouse निवडले तर त्याला खालील ड्रॉपडाऊन मधील सहा पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे व अर्ज सबमिट करायचं आहे.


• मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एखाद्या शिक्षकाचा विशेष संवर्ग 1 अथवा 2 चा अर्ज रद्द केला असेल तर त्या शिक्षकाला पुनः अर्ज करता येणार नाही व बदली प्रक्रियेतून त्याचा अर्ज बाद होईल.


• विशिष्ठ मुदतीमध्ये शिक्षकांना आपला अर्ज कितीही वेळा मागे घेता येईल व पुनः भरता येईल.

 

 

CADRE 2(विशेष संवर्ग भाग-२)


• विशेष संवर्ग भाग-२: शिक्षकांनी जर विशेष संवर्ग भाग-२ हा पर्याय निवडला तर त्यांना विशेष संवर्ग भाग-२ चा अर्ज दिसेल.


• शिक्षकांनी ३० किमी चा चेक बॉक्स चेक केला की त्यांना पुढील अर्ज दिसेल.


• आणि त्यांच्या व त्यांच्या जोडीदाराच्या शाळेमधले अंतर त्यांना येथे नमूद करावे लागेल.


• जर शिक्षकांनी प्रथम प्रकार म्हणजे दोन्ही जोडीदार जिल्हा परिषदेत कार्यरत आहे हा पर्याय निवडला तर शिक्षकाला त्याच्या जोडीदारचा शालार्थ आयडी प्रविष्ट करायचा आहे.


• अर्ज भरताना शिक्षकांना त्यांच्या व त्यांच्या जोडीदाराच्या मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करणे आवश्यक आहे.


• जर शिक्षकांनी दुसरा ऑप्शन निवडले तर त्यांना जोडीदारचा शालार्थ आयडी द्यायची आवश्यकता नाही. ते अर्ज सबमिट करू शकतात.


• मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एखाद्या शिक्षकाचा विशेष संवर्ग 1 अथवा 2 चा अर्ज रद्द केला असेल तर त्या शिक्षकाला पुनः अर्ज करता येणार नाही व बदली प्रक्रियेतून त्याचा अर्ज बाद होईल.


• विशिष्ठ मुदतीमध्ये शिक्षकांना आपला अर्ज कितीही वेळा मागे घेता येईल व पुनः भरता येईल.



वरील सूचना वाचून आपला अर्ज अचूक भरावा.


पोर्टल लिंक

https://ott.mahardd.com/

 

आपलाच 


जगन्नाथ आरू  

https://jaganaru.blogspot.com


विशेष संवर्ग भाग-1 साठी प्राधान्यक्रम

प्राधान्यक्रम

विशेष संवर्ग भाग-1 साठी प्राधान्यक्रम

 

1.

पक्षाघाताने आजारी शिक्षक

 

2.

दिव्यांग शिक्षक, मानसिक विकलांग / दिव्यांग

मुलाचे आई वडिल तसेच ज्या शिक्षकाचे जोडिदार मानसिक विकलांग / दिव्यांग आहेत असे शिक्षक

 

3.

हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक

 

4.

जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस सुरु असलेले शिक्षक

 

5.

यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक

 

6.

कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक

 

7.

मेंदूचा आजार झालेला शिक्षक

 

8.

थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार

 

9.

माजी सैनिक तसेच आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जवानाच्या पत्नी /विधवा

 

10.

विधवा शिक्षक

 

11.

कुमारिका शिक्षक

 

12.

परित्यक्ता / घटस्फोटित महिला शिक्षक

 

13.

वयाचे 53 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षक

 

14.

स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा/मुलगी/नातू/नात(स्वातःत्रय सैनिक हयात असेपर्यंत )

 

 

 

 

 

खालील आजाराने ग्रस्त शिक्षकांचे जोडीतून व्याधिग्रस्त शिक्षक

प्राधान्यक्रम

विशेष संवर्ग भाग-1 साठी प्राधान्यक्रम

 

15.

हृदय शस्त्रक्रिया झालेले

 

16.

 

17

जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले / डायलीसीस सुरु असलेले

यकृत प्रत्यारोपण झालेले.

 

18.

कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले

 

19.

मेंदूचा आजार झालेले

 

20.

थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले

 

विशेष संवर्ग भाग-2 साठी प्राधान्यक्रम

प्राधान्यक्रम

विशेष संवर्ग भाग-2 साठी प्राधान्यक्रम

1.

पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर

2.

पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर

3.

पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर

4.

पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर  महानगरपालिका /नगरपालिका

5.

पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी असेल तर

6.

पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक/कर्मचारी असेल तर

7.

पती-पत्नी दोघांपैकी एक/दोघेही शिक्षण सेवक /तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर.

आपलाच 


जगन्नाथ आरू  

https://jaganaru.blogspot.com