रविवार, ८ जून, २०२५

बदली प्रक्रिया 2025 संवर्ग भाग १ व भाग २


बदली प्रक्रिया 2025 (बदली पोर्टल सुरू झाले आहे)

विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग २

अर्ज भरण्याअगोदर आधी  खालील सूचना वाचून आपला अर्ज अचूक भरावा महत्त्वाचे


बदली पोर्टलवर सद्यस्थितीत संवर्ग एक साठी होकार /नकार व संवर्ग दोन साठी बदली कोण मागणार आहे याकरिता प्रत्यक्षात अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.


CADRE 1(विशेष संवर्ग भाग-१)

 

• विशेष संवर्ग भाग-१: शिक्षकांनी जर विशेष संवर्ग भाग-१ हा पर्याय निवडला, तर त्यांना विशेष संवर्ग भाग-१ हा अर्ज दिसेल.


• शिक्षक जर बदलीपात्र असेल आणि तो विशेष संवर्ग भाग-१ मध्येही येत असेल आणि त्याला बदलितून सूट हवी असेल तर तो 'मला बदलितून सूट हवी आहे?' या प्रश्नाचे उत्तर 'Yes' निवडेल.


• त्याचे नाव बदलीपात्र शिक्षकांच्या यादीत आहे आणि त्याला बदली विशेष संवर्ग भाग-१ मधून बदली हवी असेल तर 'मला बदलितून सूट हवी आहे?' या प्रश्नाचे उत्तर तो 'No' निवडेल.


• त्यानंतर विशेष संवर्ग भाग-१ चे प्रकार त्याला ड्रॉपडाऊन मधून निवडायचा आहे.


• जर त्याने 'स्वतःचे' Self  निवडले तर त्याला खालील ड्रॉपडाऊन मधील चौदा पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे.


• जर त्याने 'जोडीदाराचे' Spouse निवडले तर त्याला खालील ड्रॉपडाऊन मधील सहा पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे व अर्ज सबमिट करायचं आहे.


• मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एखाद्या शिक्षकाचा विशेष संवर्ग 1 अथवा 2 चा अर्ज रद्द केला असेल तर त्या शिक्षकाला पुनः अर्ज करता येणार नाही व बदली प्रक्रियेतून त्याचा अर्ज बाद होईल.


• विशिष्ठ मुदतीमध्ये शिक्षकांना आपला अर्ज कितीही वेळा मागे घेता येईल व पुनः भरता येईल.

 

 

CADRE 2(विशेष संवर्ग भाग-२)


• विशेष संवर्ग भाग-२: शिक्षकांनी जर विशेष संवर्ग भाग-२ हा पर्याय निवडला तर त्यांना विशेष संवर्ग भाग-२ चा अर्ज दिसेल.


• शिक्षकांनी ३० किमी चा चेक बॉक्स चेक केला की त्यांना पुढील अर्ज दिसेल.


• आणि त्यांच्या व त्यांच्या जोडीदाराच्या शाळेमधले अंतर त्यांना येथे नमूद करावे लागेल.


• जर शिक्षकांनी प्रथम प्रकार म्हणजे दोन्ही जोडीदार जिल्हा परिषदेत कार्यरत आहे हा पर्याय निवडला तर शिक्षकाला त्याच्या जोडीदारचा शालार्थ आयडी प्रविष्ट करायचा आहे.


• अर्ज भरताना शिक्षकांना त्यांच्या व त्यांच्या जोडीदाराच्या मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करणे आवश्यक आहे.


• जर शिक्षकांनी दुसरा ऑप्शन निवडले तर त्यांना जोडीदारचा शालार्थ आयडी द्यायची आवश्यकता नाही. ते अर्ज सबमिट करू शकतात.


• मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एखाद्या शिक्षकाचा विशेष संवर्ग 1 अथवा 2 चा अर्ज रद्द केला असेल तर त्या शिक्षकाला पुनः अर्ज करता येणार नाही व बदली प्रक्रियेतून त्याचा अर्ज बाद होईल.


• विशिष्ठ मुदतीमध्ये शिक्षकांना आपला अर्ज कितीही वेळा मागे घेता येईल व पुनः भरता येईल.



वरील सूचना वाचून आपला अर्ज अचूक भरावा.


पोर्टल लिंक

https://ott.mahardd.com/

 

आपलाच 


जगन्नाथ आरू  

https://jaganaru.blogspot.com


विशेष संवर्ग भाग-1 साठी प्राधान्यक्रम

प्राधान्यक्रम

विशेष संवर्ग भाग-1 साठी प्राधान्यक्रम

 

1.

पक्षाघाताने आजारी शिक्षक

 

2.

दिव्यांग शिक्षक, मानसिक विकलांग / दिव्यांग

मुलाचे आई वडिल तसेच ज्या शिक्षकाचे जोडिदार मानसिक विकलांग / दिव्यांग आहेत असे शिक्षक

 

3.

हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक

 

4.

जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस सुरु असलेले शिक्षक

 

5.

यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक

 

6.

कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक

 

7.

मेंदूचा आजार झालेला शिक्षक

 

8.

थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार

 

9.

माजी सैनिक तसेच आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जवानाच्या पत्नी /विधवा

 

10.

विधवा शिक्षक

 

11.

कुमारिका शिक्षक

 

12.

परित्यक्ता / घटस्फोटित महिला शिक्षक

 

13.

वयाचे 53 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षक

 

14.

स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा/मुलगी/नातू/नात(स्वातःत्रय सैनिक हयात असेपर्यंत )

 

 

 

 

 

खालील आजाराने ग्रस्त शिक्षकांचे जोडीतून व्याधिग्रस्त शिक्षक

प्राधान्यक्रम

विशेष संवर्ग भाग-1 साठी प्राधान्यक्रम

 

15.

हृदय शस्त्रक्रिया झालेले

 

16.

 

17

जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले / डायलीसीस सुरु असलेले

यकृत प्रत्यारोपण झालेले.

 

18.

कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले

 

19.

मेंदूचा आजार झालेले

 

20.

थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले

 

विशेष संवर्ग भाग-2 साठी प्राधान्यक्रम

प्राधान्यक्रम

विशेष संवर्ग भाग-2 साठी प्राधान्यक्रम

1.

पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर

2.

पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर

3.

पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर

4.

पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर  महानगरपालिका /नगरपालिका

5.

पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी असेल तर

6.

पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक/कर्मचारी असेल तर

7.

पती-पत्नी दोघांपैकी एक/दोघेही शिक्षण सेवक /तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर.

आपलाच 


जगन्नाथ आरू  

https://jaganaru.blogspot.com

गुरुवार, २० मार्च, २०२५

2025-26 येत्या वर्षात तुम्हाला किती आयकर लागू शकतो?

येत्या वर्षात 2025-26 तुम्हाला किती आयकर लागू शकतो? संभाव्य आयकर कपात किती करावी.

        माहे मार्च 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत आपले उत्पन्न किती असेल व त्यावर आकारला जाणारा आयकर नवीन नियमाप्रमाणे किती आकारल जाईल त्यावर  अनेकांची उत्सुकता आहे त्यासाठी सन 2025-26 मध्ये दरमहा आयकर कपात किती करावा असा अनेकांना प्रश्न पडला आहे कारण  १२ लाख पर्यंत सूट आहे असे आपण ऐकले असेल.

        यासोबतच यावर्षी एकूण आयकराच्या दरमहा आयकर कपात  झाला नाही तर दंड आकारण्याचे प्रयोजन आहे त्यामुळे अचूक आयकर दरमहा कपात करणे गरजेचे असल्याने आपल्याला नेमका किती आयकर कपात करावा ही समस्या असेल तर यासाठी तुम्हाला एक्सेल सॉफ्टवेअर देण्यात येत आहे त्यामध्ये आपली चालू महिन्याचे मार्च 25 चे मूळ वेतन व वाहतूक भत्ता व इतर उत्पन्न असेल ते टाकावे.NPS असल्यास Yes निवडावे नसल्यास No निवडून नेमका आपल्याला नव्या आणि जुन्या प्लॅन नुसार किती टॅक्स लागतो ते पाहता येईल व दरमहा किती कपात करावी लागेल ते कळेल त्यासाठी  https://jaganaru.blogspot.com ब्लॉगवर जाऊन फाईल  डाऊनलोड करा

                                डाऊनलोड करा





सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२५

आयकर विवरण पत्र Software 2024-25

 आयकर विवरण पत्र २०२४-२५

              आयकर विवरण पत्र २०२४- २५ Annual Statement  तयार करण्याकरिता आपल्याला एक्सेल सॉफ्टवेअरची फाईल देण्यात आली आहे, तरीही अनेक शिक्षक बांधवांनी  मागील वर्षासारखे विवरण पत्र तयार करून देण्यासाठी मागणी केली आहे, अशा ज्या शिक्षकांना आयकर विवरण पत्र हवे आहे. त्यांनी मागील वर्षी लिंक भरून आपली माहिती भरली होती त्याच माहितीच्या आधारे या वर्षाचे आयकर विवरणपत्र २०२४-२५ तयार करण्यात आले आहे. त्यांना यावर्षी लिंक मध्ये माहिती भरायची किंवा लिंक भरायची आवश्यकता नाही. 

मागील वर्षी ज्यांनी लिंक भरली नाही त्यांनी खालील लिंक भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय आयकर विवरण पत्र तयार होत नाही. किंवा पुन्हा सुद्धा लिंक भरू शकता. आयकर विवरण पत्राकरिता खालील Google लिंक वर माहिती भरण्यासाठी क्लिक करा व माहिती भरा.

Googleलिंक२०२४-२५ 


ज्यांनी आपली माहिती व लिंक भरली किंवा होती त्यांनी खालील सूचना वाचून "आयकर विवरणपत्र २०२४-२५ डाउनलोड" वर click करून करा.

सुचना

"ज्यांनी एक वेळ लिंक भरली आहे त्यांना पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही, खालील आयकर विवरण पत्र २०२४-२५ Download software वर click करुन शालार्थ आयडी व आधार क्रमांक टाका.Get Statement वर क्लिक करा Loading Please wait असे आल्यास थोडी वाट पहा तुमचे स्टेटमेंट जनरेट होत आहे.

 जनरेट झाल्यानंतर तुमचे स्टेटमेंट PDF तुम्हाला मिळेल.

 मोबाईल मध्ये काम करत असाल तर Download.pdf वर click करा तुमच्या नावाची पीडीएफ तयार झालेली मिळेल. 

लॅपटॉप किंवा कॅम्पुटरवर काम करत असाल तर Print वर click करा सेव करण्यासाठी Rename नाव विचारेल आपले नाव टाकून सेव करा.

ह्या सेवेचा उद्देश शिक्षकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये व सहजपणे शिक्षकांना मोफत सेवा सुविधा घरबसल्या उपलब्ध व्हावी हा आहे.

खालील Windows वर किंवा लिंक वर क्लिक करा.


आयकर विवरणपत्र २०२४-२५


 ज्या काही शिक्षक बांधवांना डाउनलोड करणे जमत नसेल त्यांनी तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेऊन डाउनलोड करून घ्यावे. स्टेटमेंट मध्ये काही सुधारणा असल्यास व अडचण आल्यास संपर्क करू शकता.

 आपलाच- जगन्नाथ आरु( संचालक) वाशिम जि.प शिक्षक सहकारी पतसंस्था.

 https://jaganaru.blogspot.com 

Mob 82752868

36

शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

Income Tax Excel Software 2024-25

 Income Tax Excel सॉफ्टवेअर, आर्थिक वर्ष 2024-25 (जूना व नवा पर्याय)

 सुचना 1) ही फाईल मोबाईलवर किंवा कॅम्पुटरवर सहजरित्या कुणालाही वापरता येईल (Mobile & Computer) 
 2) Computer वर काम करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन Click करा व File Download करून Open करा व सांगितल्याप्रमाणे Main Entry Sheet मध्ये माहिती भरा , तुम्हाला कोणता पर्याय जुना किंवा नवा तो दिसेल जो योग्य पर्याय असेल तो निवडा व सरळ Print घ्या. 
 4) मोबाईलवर काम करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन Click करा File Download करा save करा File manager मध्ये जाऊन Open करून सांगितल्याप्रमाणे माहिती भरा.डाऊनलोड केलेली किंवा WhatsApp वरील फाईल ओपन करा Main Entry Sheet मध्ये माहिती भरा save करा व पहा आपला लागणारा आयकर
 4) फक्त Main Entry या sheet मध्येच तुमची संपूर्ण माहिती भरा.Nps धारक असल्यास /नसल्यास होय किंवा नाही पर्याय निवडा पर्याय निवडल्याशिवाय अचूक स्टेटमेंट येणार नाही.माहीती इतरत्र भरावयाचे काम नाही.सवे करा  मोबाईलवरून print करावयाची असल्यास माहिती सिलेक्ट करा Print option किंवा Save as pdf निवडून सेव send करा.पाहिजे ती प्रिंट घ्या.
 5) माहिती भरल्यानंतर जी प्रिंट हवी असल्यास कॅम्पुटरवर ती प्रिंट घ्या. किंवा WhatsApp वर पाठवून print घ्या.
 6) तुमच्या पगाराचे वर्षाचे र्स्टेटमेंट आयकर विवरणपत्र तयार झालेले दिसेल.(१) संपूर्ण वर्षाचे पगार स्टेटमेंट (२)आयकर विवरण जुन्या पद्धतीने व नव्या पद्धतीने पद्धतीने विवरणपत्र मिळेल.
 खाली दिलेल्या लिंकवर जाऊन Click करा file open होईल वरच्या उजव्या बाजूला तीन टिंबावर Click करा share and export option निवडा त्यानंतर Download करा File maneger मध्ये जाऊन Open करून सांगितल्याप्रमाणे माहिती भरा.
तुमच्या माहितीसाठी मेन एंट्री सीट मध्येच योग्य पर्याय दिलेला आहे निर्णय तुम्हीच घ्या.ही फाईल फक्त तुमच्या माहितीसाठी व तुम्हाला पडणाऱ्या आयकर साठी दिलेली आहे.
 अडचण असल्यास - संपर्क ‍ - जगन्नाथ आरू - 8275286836/7020945857    


जि.प.शिक्षकां व्यतिरिक्त इतरांसाठी-   Download करा

काही अडचण आल्यास संपर्क करा

आपलाच- जगन्नाथ आरु( संचालक)  

वाशिम जि.प शिक्षक सहकारी पतसंस्था.

https://jaganaru.blogspot.com 

Mob 8275286836