बुधवार, १५ जून, २०२२

जिल्हांतर्गत शिक्षक बदली 2022

 जिल्हांतर्गत बदली २०२२  संपूर्ण माहिती
महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभाग

शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणाली

जिल्हा परिषद शिक्षकांच्या सुधारणेसाठी बदल्य धोरण,


शासन निर्णय क्रमांक:जिव-४८२०/प्र.क्र.२०/आस्था-१४, २५मर्झबान पथ, भवन, फोर्ट, मुंबई ४००००१,दिनांक:- ७ एप्रिल, २०२१

       बदली लॉगिन



महत्वाची तारीख

डिफिक्युलेट एरिया प्रकाशित करणे अवघड क्षेत्र घोषित करणे
: 09 ते 12 जून,c2022शिक्षकांची माहिती अपडेट करणे आणि सबमिट करणे शिक्षकांची माहिती अद्ययावत करणे :-13 ते 20 जून, 2022 प्रोफाईल प्रमाणीकरण BEO शिक्षकांचे प्रोफाईल गट शिक्षण गट शिक्षणाकडे प्रस्तुत करणे :13 ते 22 जून, E22 शिक्षक अपील शिक्षकांनी 24 ते 20 जून 2020 पर्यंत अपील करणे आणि 14 ते 20 जून, 2022 पर्यंत अपील सत्यापित करणे : 14 ते 26 जून 2022 शिक्षक प्रोफाइल अंतिम स्वीकृती शिक्षक अंतिम प्रोफाइल स्वीकारणे : 14 ते 28 जून, 2 जून 20 BEO स्वीकारणे 01 जुलै, 2022 प्रोफाइल सोशल अपील:





शिक्षकांनी सार्वजनिक आक्षेपार्ह 24 जून ते 03 जुलै, 2022
सीईओ सामाजिक अपील सुनावणी:  मुख्य कार्यकारी अधिकारी तपासाकडे   अपील चाचणी
04 आणि 05 जुलै, 2022

१००% शिक्षकानी लॉगिन करून अपूर्ण माहिती भरल


लिंक महिती आधी वाचा

सन २०२ ची बदली हि म्हणजे ऑनलाइन च्या सर्वसाधारण / अवघड क्षेत्र निवड प्रक्रिया त्यानुसार केली जाईल. फक्त आपल्या लॉगवर मागच्या फक्त पाहण्यांची यादी निवडली जाईल.


बदली सॉफ्टवेअरचे मोबाईल एपीपी नाही तर बदली सॉफ्टवेअर हे मोबाईल व्यू सॉफ्टवेअर आहे. कोणत्याही ब्राउजरला हे सॉफ्टवेअर सपोर्ट करते. व सदरचे सॉफ्टवेअर हे इंग्रजी आणि मराठी या दोन जागात बदला

शिक्षक आपले लॉगिन पोलीस विन्सेस कंपनीचे अधिकृत VDO कडून पहावेत. यासाठी शिक्षकांनी माहिती भरावी

https://youtu.be/ZnVIssAcZmE या लिंक वर क्लिक करून VDO पाहू शकता. तसेच आपले बदली पोर्टल लॉगिन करून Help And Support मधील सर्व VDO काळजीपूर्वक पहावेत. व त्यानुसारच पुढील कार्यवाही करावी.

करावयाची कार्यवाही

शिक्षकांनी आपले बदली पोर्टल लॉगिन केल्यावर DASHBOARD दिसून येत असलेल्या तारखा काळजीपूर्वक पाहाव्यात. त्या तारखेप्रमाणेच बदली प्रक्रिया असेल.


बदली पोर्टल लॉगिन केल्यावर प्रत्येक मेन्यू मध्ये आपणास काय करावयाचे आहे याबाबत माहिती दिलेली असते त्यासाठी डावीकडील कोणताही मेन्यू ओपन केल्यावर उजव्या कोपऱ्यातील निळया चिन्हावर क्लिक करावे.


Personal Details व Employment Details मधील सर्व माहिती अचूक असणे आवश्यक आहे. आपली कोणतीही माहिती चुकीची जाणार नाही याची काळजी घ्यावी. कारण आपली सर्व माहिती जिल्ह्यातील इतर सर्व शिक्षकांना दिसणार आहे.

शिक्षकांनी प्रथम https://ott.mahardd.in या लिंक वर क्लिक करावे. आपला मोबाईल नंबर नोंद करूनमो बाईलवर प्राप्त झालेला OTP टाकून आपले लॉगिन करावे.


बदली पोर्टलवर लॉगिन केल्यावर सर्व शिक्षकांना प्रथम एक सूचना दिसून येईल ती इंग्रजी / मराठी यादो न्ही भाषेत असेल ती काळजीपूर्वक वाचावी.


त्यानंतर शिक्षकांना DASHBOARD दिसून येईल यामध्ये 

CURRENT STAGE : TEACHER DATA UPDATE यामध्ये बदली पोर्टल बाबत

महत्वाच्या तारखा दिसून येतील.


त्यानंतर शिक्षकांनी डाव्या मेनू मधील PROFILE या ऑप्शनवर क्लिक करावे


YOUR PROFILE IS PENDING WITH YOURSELF असा मेसेज दिसून येईल. व त्या खाली

Personal Details


Personal Details मधील सर्व माहिती फक्त पाहू शकता पण त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. सर्व शिक्षकांना पर्सनल डिटेल्स मधील माहिती चेक करायला सांगावी यामध्ये


First Name दुरुस्ती करता येत नाही


Middle Name दुरुस्ती करता येत नाही


Last Name दुरुस्ती करता येत नाही


Date of Birth दुरुस्ती करता येत नाही


Gender दुरुस्ती करता येत नाही


Mobile Number दुरुस्ती करता येत नाही


Pan Numbar दुरुस्ती करता येत नाही


Email दुरुस्ती करता येत नाही


Shalarth Id दुरुस्ती करता येत नाही


Marital Stutas दुरुस्ती करता येत नाही

परंतू सदरच्या माहितीत दुरुस्ती असल्यास BEO यांना कळवू शकता. याबाबत यापूर्वी ३ ते ४ वेळा सर्व शिक्षकांना संधी दिलेली होती. त्यानुसार सर्व दुरुस्त्या केलेल्या आहेत.


Personal Details चेक केल्यानंतर NEXT वर क्लिक करावे


Employment Details दिसून येईल यामध्ये सर्व शिक्षकांना आपली कोणकोणती माहिती अपूर्ण आहे याची सूचना दिसेल. यामध्ये


Your Details Are Incomplete असा मेसेज सुधा दिसून येईल. व त्याखाली कोणती माहिती अपूर्ण आहे हे दिसून येईल.


1. Missing / Invalid School Joining Date


2. Last Transfer Category


3. Last Transfer Type


वरील माहिती सर्व शिक्षकांना नोंद करावयाची आहे हे लक्षात घ्यावे.

वरील माहिती व्यतिरिक्त Employment Details मधील इतर सर्व माहिती काळजीपूर्वक पाहावी. व

ज्या ठिकाणी माहिती नोंद करण्यासाठी दिलेली आहे त्या ठिकाणी नोंद करावी. इतर माहितीत काही

चूक दिसून येत असल्यास ती दुरुस्त करता येईल.


 Employment Details


Date of Appoinment in zp जिल्हा परिषद मधील हजर तारीख दिसून येईल. ती बरोबर असल्याची खात्री करावी.


Cast Category

आपला जात प्रवर्ग दिसून येईल. तो बरोबर असल्याची खात्री करावी.


Udise Code of Current School सध्या कार्यरत असलेल्या शाळेचा UDise Code दिसेल तो बरोबर आहे का याची खात्री करावी.


Appoinment Category आपला निवडीचा प्रवर्ग दिसून येईल. तो बरोबर असल्याची खात्री करावी.

 Current District Joining Date सध्याच्या जि.प. मधील हजर तारीख दिसून येईल ती बरोबर असल्याची खात्री करावी. 

Current School Joining Date सध्या कार्यरत असलेल्या शाळेतील हजर तारीख नोंद करायची आहे. Current Teacher Type Graduate / Under Graduate / Headmaster असे पद दिसून येईल ते बरोबर असल्याचे खात्री करावे.

  Teaching Sub Type जे शिक्षक पदवीधर म्हणून आहेत त्यांना आपला विषय दिसून येईल तो बरोबर आहे का याची खात्री करावी 

Teaching Medium आपल्या शाळेचे माध्यम दिसून येईल ते बरोबर असल्याचे खात्री करावे.

वरील माहितीत काही चूक आढल्यास दुरुस्त करावी.


Last Transfer Category

1) Cadre 1- Online मध्ये ज्या शिक्षकांची बदली संवर्ग 1 मधुन झाली असेल त्यांनी Cadre 1 निवडावे.


2) Cadre 2- Online मध्ये  ज्या शिक्षकांची बदली संवर्ग 2 मधुन झाली असेल त्यांनी Cadre 2 निवडावे.


3) Entitled -Online मध्ये ज्या शिक्षकांची बदली अधिकार पात्र ( संवर्ग ३ ) मधून झाली असेल त्यांनी Entitled निवडावे


4) Eligible- Online मध्ये ज्या शिक्षकांची बदली बदलीपात्र (संवर्ग -4 ) मधून झाली असेल त्यांनी Eligible निवडावे


4 ) NA- ज्या शिक्षकांची बदली प्रथम नेमणुक दिनांकापासुन पासुन आजपर्यंत झालेली नसेल, किंवा प्रमोशन, समायोजन,रिवहरशन किंवा इतर कोणत्याही प्रकारचे समुपदेशन या द्वारे बदली झाली असल्यास NA निवडावे.


Last Transfer Type


1) Inter District- आंतरजिल्हा बदली (एका जिल्हयातून दुसन्या जिल्ह्यात बदली) झाली असल्यास Inter District निवडावे 2 ) Intra District- जिल्हा अंतर्गत बदली (फक्त जिल्हयाच्या आत मध्येच) झाली असल्यास Intra District निवडावे


    ज्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली आहे पण कार्यमुक्त केलेले नाही त्यांनी NA निवडावे. पण Online मध्य त्यांची जिल्हाअंतर्गत बदली झाली असल्यास Intra District निवडावे.


     यानंतर काही शिक्षकांना एक प्रश्न विचारला जाईल. तो प्रश्न सध्या कार्यरत असलेली शाळा ज्या क्षेत्रात आहे त्यानुसार असेल म्हणजे सध्याची शाळा Online नुसार  सर्वसाधारण क्षेत्रात असेल तर सर्वसाधारण क्षेत्राबाबत प्रश्न असेल व सध्याची शाळा Online नुसार अवघड क्षेत्रात असेल तर अवघड क्षेत्राबाबत प्रश्न असेल तो अशाच शिक्षकांना विचारला जाईल कि

ज्या शिक्षकांची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात ५ वर्षापेक्षा जास्त व १० वर्षा पेक्षा कमी असेल. 

ज्या शिक्षकांची सेवा अवघड क्षेत्रात ३ वर्षापेक्षा जास्त व १० वर्षा पेक्षा कमी असेल.

तो प्रश्न खालीलप्रमाणे असेल

जे शिक्षक सध्या Online च्या यादीनुसार सर्वसाधारण क्षेत्रात आहेत त्यांना सर्वसाधारण क्षेत्रात सलग सेवा १० वर्ष झाली आहे का ? (Have You Worked Continuously In non Difficult Area For Last 10 Years ? असा प्रश्न विचारला जाईल. Yes/No लागू असेल ते लिहावे.

जे शिक्षक सध्या Online च्या यादीनुसार अवघड क्षेत्रात आहेत त्यांना अवघड क्षेत्रात सलग सेवा १० वर्ष झाली आहे का? (Have You Worked Continuously In Difficult Area For Last 10 Years ?) असा प्रश्न विचारला जाईल.

वरील प्रश्नाचे उत्तर शिक्षकांनी अचूक द्यावे कारण आपण YES / NO असे दिले असले तरी त्याची पडताळणी BEO कार्यालयाकडून केली जाणार आहे

Have You been Suspended in Last 10 Years:- Yes / No लिहावे


त्यांतर NEXT वर क्लिक करावे.


Profile Preview दिसून येईल व उजव्या कोप-यात असे चिन्ह दिसेल या चिन्हावर क्लिक करून आपण आपली नोंद केलेली माहिती डाउनलोड करून घेवू शकता Profile Preview मधून सर्व माहिती पाहून बरोबर असल्याची खात्री करावी. पूर्ण खात्री झाल्यावरच SUBMIT क्लिक करावे OTP टाकून Submit करावे.

 आता आपली माहिती तपासण्यासाठी BEO याच्याकडे गेलेली आहे.


आपणास सॉफ्टवेअर कंपनीकडून तात्काळ मेल प्राप्त होईल. व


YOUR PROFILE IS PENDING WITH YOUR BEO असा मेसेज शिक्षकांना आपल्या लॉगिनवर दिसून येईल.


हि  माहिती BEO आपल्या सेवा पुस्तकातील नोंदीनुसार तपासून पुन्हा एकदा आपल्याकडे पाठवणार आहेत. त्यासाठी शिक्षकांनी परत एकदा आपले बदली पोर्टल लॉगिन करून डाव्या मेनू मधील PROFILE या ऑप्शनवर क्लिक करावे त्यांतर Personal Details माहिती दिसेल व शेवटी असणा-या Next बटणावर क्लिक करावे Employment Details माहिती दिसून येईल. त्याच्या शेवटी असणा-या Next बटणावर क्लिक करावे. आता Profile Preview दिसून येईल व सर्वात शेवटी आपली माहिती तपासली आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांचे नाव दिसून येईल.

व त्याखाली स्तरावर


Enter SubjectEnter Your Comments Here असे दोन बॉक्स दिसतील त्यामध्ये रिमार्क देवू शकता


BEO यांच्याकडून आलेली माहिती बरोबर असेल तर आपण ACCEPT या बटणावर क्लिक करावे.


जर शिक्षकांनी ACCEPT बटणावर क्लिक केले तर पुन्हा OTP विचारेल व मोबाईलवर / मेलवर आलेला OTP नोंद


केल्यावर सक्सेस असा मेसेज येईल

व आपल्या लॉगिनवर असलेला YOUR PROFILE IS PENDING WITH YOURSELF


हा मेसेज जावून YOUR PROFILE IS ACCEPTED असा मेसेज दिसून येईल.


आता आपले PHASE 1 चे काम संपले आहे असे समजावे. Or

जर आपणास BEO कडून पाठवलेली माहिती चुकीची वाटत असल्यास शिक्षक मा. शिक्षणाधिकारी (EO) यांच्याकडे अपील करु शकतात. त्यासाठी APPEALL TO EO या बटणावर क्लिक करावे.


त्यांतर EO स्तरावर योग्य ते कागदपत्र सादर केल्यावर आपल्या अपिलावार मा. शिक्षणाधिकारी निर्णय घेतील व आपले म्हणणे योग्य असल्यास योग्य तो बदल करून माहिती आपल्याकडे पाठवतील. त्यांतर EO स्तरावरून आलेली माहिती अंतिम असल्याने शिक्षकांनी ACCEPT या बटणावर क्लिक करावे.


आता संबधित शिक्षकांचे PHASE 1 चे काम संपले आहे असे समजावे.



(शासन निर्णय काय म्हणतो)


बदलीची व्याख्या


१.१अवघड क्षेत्र :- परिशिष्ट १ मध्ये नमूद असणाऱ्या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची/निकषांची पूर्तता होईल असे गाव/शाळा

अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल.

१.२ सर्वसाधारण क्षेत्र:- वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील.

१.३ बदली वर्ष:-ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष.

१.४ बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा : अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली

वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा.

१.५ शिक्षक :- या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत

असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक 

१.६ सक्षमप्राधिकारी:- शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील.

१.७ बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक :- बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची

अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक


बदलीचे टप्पे - 

२. शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे.
२.१ जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे :-
२.२ प्रशिक्षण :- जिल्हास्तरावरील व तालुका स्तरावरील बदली प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व शिक्षक यांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे आयोजित करतील. 
२.३ शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे :
२.४ शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे :
३. शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे : 
४  बदली प्रक्रिया कार्यपध्दती :
४.१ टप्पा क्र. १ :- रिक्त पदे जाहीर करणे
४.२ टप्पा क्र.२ :- विशेष संवर्ग शिक्षक भाग - १ यांच्या बदल्या :
४.३. टप्पा क्र. ३ :- विशेष संवर्ग शिक्षक भाग - २ यांच्या बदल्या :
४.४. टप्पा क्र.४ - बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या :
४.५ टप्पा क्र. ५ :- बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपध्दती : 
४.६ टप्पा क्र. ६:- विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा :
४.७ कार्यमुक्तीचे आदेश :
५.  इतर धोरणात्मक बाबी :
प्रतिनियुक्ती
५.१० बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार :


संवर्ग

१.८ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ :- 


खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक, भाग-१म्हणून गणले जातील.

१.८.१ पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)

१.८.२ दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११

मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग

मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ). तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार

मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक.

१.८.३ हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक

१.८.४ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक /डायलीसीस सुरु असलेले

शिक्षक

१.८.५ यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.

१.८.६ कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक

१.८.७ मेंदूचा आजार झालेले शिक्षक

१.८.८ थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदा. Methyl

Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase defiency व इतर आजार)} (पालक म्हणजे

आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ)

१.८.९ माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा

१.८.१० विधवा शिक्षक

१.८.११ कुमारीका शिक्षक

१.८.१२ परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक १.८.१३ वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक

१.८.१४ स्वांतत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत) खालील

आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :

१.८.१५ हृदय शस्त्रक्रिया झालेले.

१.८.१६ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु

असलेले.

१.८.१७ यकृत प्रत्यारोपण झालेले

१.८.१८ कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले.

१.८.१९ मेंदूचा आजार झालेले.

१.८.२० थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले.

१.९ विशेष संवर्ग शिक्षक भाग २ : 

पती-पत्नी एकत्रीकरण (जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकां पासून ३० कि.मी. पेक्षा जास्त

अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.)

१.९.१ पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर

१.९.२ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर,

१.९.३ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर,

१.९.४ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा

कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका/ नगरपालिका

१.९.५ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक

उपक्रमातील कर्मचारी.

 १.९.६ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक /

कर्मचारी असेल तर,

१.१० बदलीस पात्र शिक्षक :-

 बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा

१० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पुर्ण झलेली आहे असे

शिक्षक. तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात

१० वर्षे पुर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड

क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात

• १० वर्षे पुर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली

करुन पदस्थापित करण्यात येईल.



४.३. टप्पा क्र. ३ :- विशेष संवर्ग शिक्षक भाग - २ यांच्या बदल्या :


४.३.१. टप्पा क्र. २ प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग-२ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तदनंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग २ यांच्या बदल्या करण्यात याव्यात.


४.३.२. जे शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ मध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र क्र. ४ मधील नमुन्यात स्वयंघोषीत प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे. ४.३.३. जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करु शकेल.


४.३.४. उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्यपध्दती लागू होतील. या तरतुर्दीप्रमाणे संबंधिताची बदली पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक एकक (one unit) मानून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा ३० कि.मी. परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे. यापैकी एकाची पण १० वर्ष सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र घरण्यात येईल.


४.३.५.३० कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदरचे ३० कि.मी. रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम हे सक्षम प्राधिकारी रहातील.


४.३.६. विशेष संवर्ग २ च्या खाली बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.


४.४. टप्पा क्र.४ - बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या :


४.४.१. टप्पा क्र.३ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील.


४.४.२. यासाठी ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची ३ वर्षाची बदली करावयाची निश्चित घरावयाची अवघड क्षेत्रातील सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र - १ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. 

४.४.३. सदर कर्मचाऱ्याच्या बदल्या ह्या. त्यांच्या बदल्यासाठी पात्र धरावयाच्या सेवा ज्येष्ठतेनुसार करण्यात येतील. 

४.४.४. सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने जेष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील.

४.४.५. बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील.

४.४.६, बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही.


४.५ टप्पा क्र. ५ :- बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपध्दती : 


४.५.१. टप्पा क्र.१,२,३ व ४ मध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दतीमुळे, बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठतायादी, जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधि देण्यात येईल.


४.५.२. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचान्यास बदली प्राधान्याने अनुज्ञेय राहील.


४.५.३. या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राध्यान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील. परंतु ह्या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवावयाच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील, त्याच रिक्त पदांवर बदली होऊ शकते.


४.५.४. या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल. ४.५.५. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र. ४ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.


४.६ टप्पा क्र. ६:- विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा :

★ टप्पा क्र. ५ पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्र.५ मधून उरलेल्या शिक्षकांना त्यांना पसंतीक्रमामध्ये बदल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात येईल. टप्पा क्र. ५ नुसार सर्वांची सेवाज्येष्ठता व पसंतीक्रमानुसार बदली करण्यात यावी. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र. ५ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.


४.७ कार्यमुक्तीचे आदेश :

बदलीने पदस्थापनेचे आदेश निर्गमित करताना त्यामध्ये कार्यमुक्तीचा दिनांक नमूद करण्यात यावा. कार्यमुक्तीच्या दिनांकानंतर ते बदली होण्यापूर्वी ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणावरुन त्यांचे वेतन अथवा कोणतीही देयके अदा करु नयेत. बदलीनंतर संबंधित शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू होत नसेल तर अशा शिक्षकाविरुध्द मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी.

 ५.  इतर धोरणात्मक बाबी :

५.१ शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीनेच करण्याचा निर्णय शासन घेत आहे. यासाठी खालील प्रमाणे कार्यपध्दती अवलंबण्यात यावी.


५.१.१. राज्य स्तरावर शिक्षकांच्या ऑनलाईन पध्दतीने बदल्यांसाठी एक नोडल ऑफीसरची नेमणूक करण्यात येईल.


५.१.२. तांत्रिक बाबींसाठी एक कार्यक्रम अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी. जिल्हा स्तरावरील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची त्यांची जबाबदारी राहील. 

५.२ मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्येक शिक्षकाचा पसंतीक्रम दिसेल. शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर संबंधित संगणक यंत्रणेने बदलीच्या पूर्ण प्रकियेची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उपलब्ध करुन द्यावी.


५.३ बदली ही संपूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाची बाब असल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याने राजकीय दबाव वापरल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७ मधील नियम ६(५) चा भंग केला म्हणून ती कृती शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील.

५.४ विनंती बदल्यांसाठी कोणतेही भत्ते व पदग्रहण अवधी अनुज्ञेय राहणार नाही.

५.५ प्रशासकीय अथवा विनंती बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरती प्रतिनियुक्ती अशा मार्गाने त्यांच्या पूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणी किंवा कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिकं सोयीसाठी इतरत्र पदस्थापना देऊ नये. या प्रकारचा प्रयत्न बदलीतील अवैधता/अनियमितता समजून संबंधित अधिकारी शिस्तभंग कारवाईस पात्र होतील.

५.६ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना बदल्या सामान्यपणे वर्षातून एकदाच दिनांक १ मे ते ३१ मे पर्यंत करण्यात याव्यात. 

५.७ काही शिक्षकांनी त्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यासंदर्भात मा.उच्च वा सक्षम न्यायालयात दावा दाखल केला असल्यास अशा प्रकरणात मा.उच्च न्यायालय वा सक्षम न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सर्वप्रथम अंमलबजावणी करावी व तदनंतर या शासन निर्णयानुसार जिल्हांतर्गत बदल्याबाबत पुढील कार्यवाही सुरु करावी.


५.८ आरटीई अॅक्टनुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त ठेवणे शक्य नाही. त्यामुळे समानीकरणाचे धोरण सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी नियमानुसार राबविण्यात येईल, याची दक्षता घ्यावी. समानीकरणाच्या जागा निश्चित करण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित जिल्हा परिषदांचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची समिती गठीत करण्यात यावी. समानीकरणासाठी कोणत्या जागा निश्चित कराव्यात, याबाबतचा निर्णय सदर समितीने घ्यावा.


५.९ जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रस्तावांतर्गत बदल प्रचलित संगणकीय निकालाच्या निकालाच्या तारखेपर्यंत १ मे ते ३१ मे पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पूर्णत: सूचित केले आहे. त्या व्यक्तीला काही कारण अपरिहार्य व योग्यतास्तव (प्रसुती राजेवर, बाल संगोपन राजेवर, गंभीर लोकशाही किंवा इतर बाबी) बदली करावयाची ती बदली न प्रतिनियुक्ती यावी. सदर प्रतिनियुक्त ही विभागीय निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखी मान्यतेने यावी.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: