महत्त्वाची सूचनासर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी, प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनीचे प्रशिक्षण पुर्ण झाल्यास प्रमाणपत्र डाऊनलोड करु शकता.त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व डाऊनलोड करा.
प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
----------------------------------------------------------------------
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
महत्त्वाची सूचना
सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी,
राज्यातील शिक्षक/ मुख्याध्यापक/अध्यापकाचार्य/ प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये दिनांक १ जून २०२२ पासून सुरू होत आहे.
सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्यातील एकूण 94,541 नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.
सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण ५० ते ६० तासांचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार, पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यास त्याच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.
सदर प्रशिक्षणबाबतची सर्व माहिती दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता
या यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीनीं सदर उद्बोधन सत्रास उपस्थित रहावे. तसेच सर्व पात्र प्रशिक्षणार्थ्यांसाठी दिनांक १ जून २०२२ पासून ३० जून २०२२ पर्यंत तांत्रिक अडचणी संदर्भात मार्गदर्शन सत्रांचे आयोजन देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत केले जाणार आहे. याबाबतची सर्व माहिती दि.१ जून २०२२ रोजी आयोजित यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे दिली जाईल.
📌वेबसाईट : www.maa.ac.in
📌वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट : https://training.scertmaha.ac.in/
📌ट्विटर :https://twitter.com/scertmaha
📌फेसबुक :https://www.facebook.com/MahaSCERT
-----------------------------------------------------------------------------------------------------
दि.१४ मे २०२२
वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण- महत्त्वाचे
वरीष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी
वरीष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी https://training.scertmaha.ac.in/Lists/SchoolList.aspx यावर क्लिक करा. जिल्हयाचे नाव येईल नंतर तालुका सिलेक्ट करा शाळा दिसतील Show Teacher वॉर क्लिक करा शिक्षकाच्या नावाची यादी दिसेल .
तालुकानिहाय शाळेची यादी पाहावयाची असल्यास खालील नावावर क्लिक करा
तालुकानिहाय शाळा
इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.
वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण- महत्त्वाचे सूचना
सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे , तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
सदर प्रशिक्षणासाठी आवश्यक तपशील, प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी आपणास https://training.scertmaha.ac.in/ या वेबसाईटवर पाहायला मिळेल. सोबत इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.
सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी स्थळ, ठराविक वेळ, प्रत्यक्ष उपस्थिती यांची मर्यादा असणार नाही.
यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही.
सदर प्रशिक्षणाबाबत इतर कोणत्याही समाजमाध्यमांवर आलेली माहिती ही अधिकृत समजू नये व त्यावर विश्वास ठेवू नये.
अधिकृत माहितीसाठी आपण परिषदेच्या खालील संकेत स्थळ आणि परिषदेच्या समाजमाध्यमांवर असणाऱ्या चॅनल/पेज वर आपण भेट देऊ शकता.
📌वेबसाईट : www.maa.ac.in
📌वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट : https://training.scertmaha.ac.in/
📌ट्विटर : https://twitter.com/scertmaha
📌फेसबुक :
https://www.facebook.com/MahaSCERT
एम डी सिंह,
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा