शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४

विधानसभा 2024 पोस्टल मतदान कसे करावे

पोस्टल मतदान कसे करावे
 पोस्टल मतदान करताना होणाऱ्या चुका कशा टाळल्या पाहिजेत म्हणजे आपले मत बाद होणार नाहीं 
१.आपणास संबंधीत प्रशिक्षण सुविधा केंद्रावर मोठे पाकीट (C) दिले जाईल. 
२. ते पाकीट एका बाजूने फाडून उघडावे . 
3. त्यामध्ये आणखी एक पाकीट(B)आहे. 
4. ह्या B पाकीटामध्ये यापेक्षा छोटे (A) पाकीट व घोषणा पत्र आहे. हे मतदान कक्षात जाऊन बाहेर काढणे.व सर्वात छोटे असनारे A पाकिटातून मत पत्रिका बाहेर काढणे. 
5. मत पत्रिकावरील क्रमांक प्रथम घोषणा पत्रावर नमूद ठिकाणी व छोट्या पाकिटावर पण अचूकपणे पेनाने टाकावा घोषणा पत्रावरील संपूर्ण मजकूर भरावा.घोषणा पत्रावर तेथे उपस्थीत अधिकारी यांची सही व शिक्का घ्यावा.अत्यावश्यक आहे.
 6. मत पत्रिकेवर आपल्या आवडत्या उमेदवारा समोर नमूद ठिकाणीं ✔️ किंवा ❌ असे चिन्हाची खूण (निशाणी) करावी.हे करत असताना वरच्या व खालच्या उमेदवाराच्या पर्यंत आपली खुणाची रेषा चिटकायला नको. 
7. पहिल्या सारखी घडी घालून A पाकीटामध्ये मतपत्रिका टाकून डिंकाने बंद करावे. 
8. घोषणापत्र व A पाकीट वेगळे आहे. घोषणापत्र मत पत्रिका सोबत A मध्ये बंद करायचे नाहीं.घोषणापत्र व A पाकीट दोन्ही हे B पाकीटात टाकून B पाकिट बंद करावे. इथे चूक होते ती टाळावी. 
9. मग B पाकिटावर खालच्या बाजूला विहित ठिकाणी सही करायची व हे B पाकीट पेटीत टाकायचे. 
मग मत मोजले जाते. 
 मतपत्रिका रद्द्ची कारणे 
१ घोषणा पत्रावर मत पत्रिका क्रमांक नसणे 
२. Attestation अधिकारी सही नसणे 
3. खूण चुकीच्या पद्धतीने नेमके कोणाला मत दिले असे न समजणे सारखी करणे 
4. B पाकिटावर सही नसणे हि रद्द ची कारणे आहेत.
 " मतदान ही आपली जबाबदारी आहे ती अचूक पार पाडा "